१९ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.

१८४८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८१८)

१८६०: भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८१२)

१९१५: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचे निधन. (जन्म: १४ जून १८६४)

१९२७: क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९७)

१९२७: क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९००)

१९९७: स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेन्द्र बारलिंगे यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९१९)

१९९७: सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०८)

१९९८: भावगीतगायक जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे यांचे निधन.

१९९९: रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचे निधन. (जन्म: २४ मे १९३३)

२०१४: भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.