१९ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१९३५: भारतीय (बंगाली) दिग्दर्शक, अभिनेते, आणि पदमभूषण पुरस्कार विजेते सौमित्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (निधन: १५ नोव्हेंबर २०२०)

१७३६: वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.

१८०९: अमेरिकन गूढ व भयकथांचे लेखक व कवी एडगर अ‍ॅलन पो यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १८४९)

१८८६: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९५२)

१८९२: विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म.

१८९८: मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९७६)

१९०६: चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म.

१९२०: संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस झेवियर पेरेझ द कुइयार यांचा जन्म.

१९३६: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८१)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.