१९ जुलै रोजी झालेले मृत्यू.

९३१: जपानचे सम्राट उडा यांचे  निधन. (जन्म: ५ मे ८६७)

१३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.

१८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)

१९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७५)

१९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन. (जन्म: २९ जून १९०८)

१९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम यांचे निधन.

२००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे निधन.

२०२०: भारतीयचित्रपट दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.