१९ जून रोजी झालेल्या घटना.

१६७६: शिवाजी महाराजांनी प्श्चात्त्पादग्ध सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध करून हिंदू धर्मात पुन्हा समाविष्ट केले.

१८६२: अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.

१८६५: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.

१९१२: अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.

१९४९: चार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.

१९६१: कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९६६: शिवसेनेची स्थापना.

१९७७: ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.

१९७८: ईंग्लंडच्या इयान बोथम याने पाकिस्तान विरुद्ध लॉर्डसवर ८ बळी घेऊन शतक सुधा केले.

१९७८: गारफील्डया कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.

१९८१: भारताच्या ‘अॅपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९८९: ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९९९: मैत्रेयी एक्स्प्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.