१९ मार्च रोजी झालेले मृत्यू.
१८८४: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन. (जन्म: १६ मे १८२५)
१९७८: भारतीय वकील आणि राजकारणी एम. ए. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९१)
१९८२: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
१९९८: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचे निधन. (जन्म: १३ जून १९०९)
२००२: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)
२००५: डेलोरेअन मोटर कंपनी चे सहसंस्थापक जॉन डेलोरेअन यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १९२५)
२००८: विज्ञान कथालेखक व संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १९१७)