१९ मे रोजी झालेले जन्म.

१८८१: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८)

१८९०: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९६९)

१९०८: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर  १९५६)

१९१०: नथुराम गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९४९)

१९१३: भारताचे ६ वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९६ – बंगळुरू)

१९२५: ख्मेर रुज चे नेते पॉल पॉट यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९९८)

१९२५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९६५)

१९२६: आध्यात्मिक गुरू आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म.

१९२८: लोटस कार कंपनी चे स्थापक कोलिन चॅपमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८२)

१९३४: भारतीय लेखक आणि कवीरस्किन बाँड यांचा जन्म.

१९३८: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म.

१९६४: तामिळ अभिनेता मुरली यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर २०१०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.