१९ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.

१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन.

१७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन.

१८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)

१९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन.

१९३६: हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८६०)

१९६३: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १८९१ – ड्युनेडिन, न्यूझीलंड)

१९८७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचे निधन. (जन्म: १० मे १८९७)

१९९२: साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना. रा. शेंडे यांचे निधन.

१९९३: म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी दिनशा के. मेहता यांचे निधन.

२००२: रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९५४)

२००४: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२८)

२००७: मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.