२ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१८२०: ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडाल यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३)

१८३४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९०४)

१८३५: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९०१)

१८६१: भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९४४)

१८७६: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९६३)

१८७७: भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९६५)

१८९२: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९७८)

१९१०: कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८)

१९१८: आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा जे. पी. वासवानी यांचा जन्म.

१९२९: भारतीय राजकारणी विद्याचरणा शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुन २०१३)

१९३२: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक लमेर हंट यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर २०१६)

१९४१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ ज्यूल्स हॉफमन यांचा जन्म.

१९४५: भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म.

१९५८: भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक अर्शद अयुब यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.