२ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

१८५५: कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९२३ – बंगळुरू, कर्नाटक)

१८८५: यकृत आणि यकृताच्या स्रावांचा अभ्यास करणारे शास्रज्ञ जॉर्ज रिचर्ड यांचा जन्म.

१८९८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इन्दर लाल रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९१८)

१९०५: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक अनंत काणेकर यांचा जन्म.

१९३७: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म.

१९४२: मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा जन्म.

१९४४: कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष इब्राहिम रुगोवा यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी २००६)

१९४७: भारतीय क्रिकेटपटू धीरज पारसणा यांचा जन्म.

१९५९: अभिनेते बोमन ईराणी यांचा जन्म.

१९७२: भारतीय क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.