२ जानेवारी रोजी झालेल्या घटना.

१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

१८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.

१८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.

१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला.

१९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.

१९४५: दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले.

१९५१: रशियाने ल्युना-१ हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.

१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.

१९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.

१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या.

१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.

१९९९: अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये १४ इंच तर शिकोगामध्ये १९ इंच बर्फ पडला. शिकागोचे तापमान -‌‍१३°F इतके कमी झाले.

२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.