२ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१३१६: दिल्लीचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन.

१९३५: स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)

१९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.

१९४४: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८७३)

१९५२: व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.

१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन.  (जन्म: १२ एप्रिल १९५४)

१९९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.

२००२: पर्यावरणवादी अनिल अग्रवाल यांचे निधन.

२०१५: भारतीय हवामान शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३३)

२०१६: भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी सरचिटणीस आणि स्वातंत्र्यसेनानी अर्धेन्दू भूषण बर्धन यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.