२ जुलै रोजी झालेले जन्म.

१९४१: भारतीय चित्रपट अभिनेत्या आशालता वाबगावकर यांचा जन्म. ( निधन: २२ सप्टेंबर २०२०)

१८६२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म.

१८७७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेस यांचा जन्म.

१८८०: श्रेष्ठ गायक, नेट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)

१९०४: फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ता यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९९६)

१९०६: नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.

१९२२: फ्रेन्च फॅशन डिझायनर पिअर कार्डिन यांचा जन्म.

१९२३: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म.

१९२५: काँगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)

१९२६: विनोदी लेखक वि. आ. तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म.

१९३०: अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.