२ जून रोजी झालेल्या घटना.

१८००: कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.

१८९६: गुग्लियेमो मार्कोनीला रेडिओचे पेटंट बहाल.

१८९७: आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेन म्हणाले, माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.

१९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.

१९४६: राजा उंबेर्तो-२ ला हटवून इटलीने राजेशाही संपवली स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.

१९४९: दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

१९५३: इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.

१९७९: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

१९९९: भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.

२०००: लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर.

२०१४: तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.