२ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

१४७०: इंग्लंडचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (पाचवा)

१७५५: फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १७९३)

१८३३: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९०४ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

१८८२: महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९६३)

१८८६: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९७१)

१८९७: दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते,  सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९८४)

१९२१: ध्वनिमुद्रणतज्ञ रघुवीर दाते यांचा जन्म.

१९२९: बोस कॉर्पोरेशन चे संस्थापक अमर बोस यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१३)

१९४१: केन्द्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांचा जन्म.

१९६०: संगीतकार अनु मलिक यांचा जन्म.

१९६५: अभिनेता व निर्माता शाहरुख खान यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.