२ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.

१८८५: मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे गुर्लहोसूर यांचे निधन.

१९५०: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८५६)

१९५४: ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.

१९८४: मराठी साहित्यिक शरद्चंद्र मुक्तिबोध यांचे निधन.

१९९०: गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९०३)

२०१२: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)

२०१२: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.