२ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.

९७१: गझनीचा महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १०३०)

१८४७: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९३४)

१८६९: मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.

१८९१: पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६७)

१९०४: भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)

१९०८: विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार तथा गं. बा. सरदार यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९८८)

१९२७: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी २०१०)

१९३९: भारतीय क्रिकेटपटू बुद्धी कुंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून २००६)

१९४२: चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म.

१९४८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९९८)

१९६८: झेक लॉन टेनिस खेळाडू याना नोव्होत्‍ना यांचा जन्म.

१९७१: संगीतकार व गायक कौशल इनामदार यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.