२० एप्रिल रोजी झालेले जन्म.

७८८: आदि शंकराचार्य यांचा जन्म.

१७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.

१८०८: फ्रान्सचे पहिले अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १८७३)

१८८९: नाझी हुकूमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)

१८९६: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९६८)

१९१४: ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९१)

१९३९: ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर यांचा जन्म.

१९५०: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म.

१९६६: याहू चे सहसंस्थापक डेव्हिड फिलो यांचा जन्म.

१९८०: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.