२० ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१९३९: भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८४५)

१९८४: सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे यांचे निधन. (जन्म: २४ मे १९२४)

१९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९३२)

१९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे यांचे निधन.

१९९७: गुजराथी नाटककार लेखक प्रागजी डोस्सा यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९०७)

२०००: चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता यांचे निधन.

२००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी यांचे निधन.

२०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)

२०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन.

२०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)

२०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.