२० फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.

१९०५: भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन.

१९१०: इजिप्तचे पंतप्रधान ब्युट्रोस घाली यांचे निधन.

१९५०: स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १८८९)

१९७४: नाट्यसमीक्षक के. नारायण काळे यांचे निधन.

१९९३: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचे निधन.

१९९४: घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यं. कृ. टोपे यांचे निधन.

१९९७: पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांचे निधन.

२००१: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९१९)

२०१२: संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्‍नाकर मंचरकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.