२० जुलै रोजी झालेले जन्म.

ख्रिस्त पूर्व ३५६: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून ख्रिस्त पूर्व ३२३)

१८२२: जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)

१८३६: ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)

१८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७१)

१९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी यांचा जन्म.

१९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

१९२१: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९९४)

१९२९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९९९)

१९७६: भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.