२० जुलै रोजी झालेले मृत्यू.

१९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन.

१९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १८७४)

१९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८८२)

१९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन.

१९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)

१९७२: अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)

१९७३: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)

१९९५: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९३५)

२०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१९)

२०२०: भारतीय राजकारणी व सुप्रसिद्ध सामाजिक न्याय नेते राम अवधेशसिंग यादव यांचे निधन. (जन्म: १ जून १९३७)

२०२०: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते ओडिया चित्रपट अभिनेते विजय मोहंती यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९५०)

२०२०: भारतीय मुस्लिम विद्वान व सहारनपुरमधील मजहीर उलूमचे कुलगुरू सलमान मझिरी यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९४६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.