२० जून रोजी झालेल्या घटना.

१८३७: इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया यजमान झाल्या.

१८४०: सॅम्युअल मोर्स यांना टेलिग्राफ चा पेटंट मिळाला.

१८६३: वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.

१८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरवात केली.

१८८७: देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.

१८९९: केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.

१९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.

१९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.

१९९०: ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.

१९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.

२००१: परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.