२० जून रोजी झालेले जन्म.

१८६९: किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६)

१९१५: चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)

१९२०: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते मनमोहन अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)

१९३९: जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९९८)

१९४६: पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष जनाना गुस्माव यांचा जन्म.

१९४८: नौरूचे राष्ट्राध्यक्ष लुडविग स्कॉटी यांचा जन्म.

१९५२: भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्म.

१९५४: इंग्लिश क्रिकेटपटू अ‍ॅलन लॅम्ब यांचा जन्म.

१९७२: क्रिकेटपटू पारस म्हांब्रे यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.