२० मे – मृत्यू

१५०६: इटालियन दर्यावर्दी व संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचे निधन.
१५७१: राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु, केशवचैतन्य ऊर्फ बाबाचैतन्य यांनी जुन्‍नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली.
१७६६: इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १६९३)
१८७८: समाजसुधारक व संस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.
१९३२: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)
१९६१: कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई विष्णूपंत चितळे यांचे निधन.
१९९२: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगांवकर यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१६)
१९९४: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. ब्रम्हानंद रेड्डी यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९०९)
१९९७: इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर यांचे निधन.
२०१२: भारतीय मानववंशशास्त्रज्ञ लीला दुबे यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १९२३)
२०१२: रिमोट कंट्रोल चे शोधक यूजीन पॉली यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९१५)