२० ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.

१८५५: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई)

१८९१: अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९७४)

१८९३: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)

१९१६: लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)

१९२०: भारतीय वकील आणि राजकारणी सिद्धार्थ शंकर रे यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर २०१०)

१९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २००७)

१९६३: क्रिकेटपटू, समालोचक व खासदार नवजोत सिंग सिद्धू यांचा जन्म.

१९७८: भारतीय फलंदाज वीरेन्द्र सहवाग यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.