२१ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१८६४: जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९२०)

१९२२: स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९८७)

१९२६: इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचा जन्म.

१९३४: महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचा जन्म.

१९४५: भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांचा जन्म.

१९५०: हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.