२१ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू.

१९३१: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १८७२)

१९४०: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८७९)

१९४७: बुगाटी कंपनी चे संस्थापक इटोर बुगाटी यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८८१)

१९७६: प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८९९)

१९७७: एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रेमलीला ठाकरसी यांचे निधन.

१९७८: भारतीय क्रिकेट खेळाडू विनू मांकड याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१७)

१९८१: गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर याचं निधन. (जन्म: १ डिसेंबर १८८५ – सातारा, महाराष्ट्र)

१९९१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १९१४)

१९९५: नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९१०)

२०००: समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा निर्मला गांधी यांचे निधन.

२०००: स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांचे निधन.

२००१: मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)

२००१: मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर यांचे निधन.

२००४: भारतीय उडिया भाषा कवी सच्चिदानंद राऊत यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१६)

२००६: भारतरत्न ख्यातनाम सनईवादक बिस्मिला खान यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९१६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.