२१ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१७९३: फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)

१९०१: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३५)

१९२४: रशियन क्रांतिकारक व्लादिमिर लेनिन यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८७०)

१९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. (जन्म: २३ मार्च १९२३)

१९४५: क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे टोकियो जपान येथे निधन. (जन्म: २५ मे १८८६)

१९५०: इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल यांचे निधन. (जन्म: २५ जून १९०३)

१९५९: दिगदर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते सेसिल बी. डी. मिल यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८८१)

१९६५: अभिनेत्री हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली यांचे निधन.

१९९८: भारताचे ९ वे नौदल प्रमुख सुरेन्द्रनाथ कोहली यांचे निधन. (जन्म: २१ जून १९१६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.