२१ जुलै रोजी झालेल्या घटना.

इ.स. पूर्व ३५६: जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.

१८३१: बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.

१९४४: २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी.

१९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.

१९७६: आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या.

१९८३: अंटार्क्टिका वरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस या पृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.

२००२: जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.