२१ जून रोजी झालेले मृत्यू.

१८७४: स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम यांचे निधन.

१८९३: अमेरिकन उद्योगपती तसेच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक लिलँड स्टॅनफोर्ड यांचे निधन.

१९२८: सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १८८२)

१९४०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८८९)

१९५७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ योहानेस श्टार्क यांचे निधन.

१९७०: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचे निधन. (जन्म: ६ जून १९०१)

१९८४: मराठी चित्रपट नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १९३५)

२००३: अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)

२०१२: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचे निधन. (जन्म: १२ जून १९१७)

२०१२: भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार सुनील जना यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १९१८)

२०२०: आधुनिक घरवल लोकसंगीताचे जनक जीत सिंग नेगी यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९२५)

२०२०: रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम करणारे भारतीय क्रिकेटपटू राजिंदर गोयल यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १९४२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.