२१ मार्च रोजी झालेले जन्म.

१७६८: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १८३०)

१८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९०६)

१८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९५४)

१९१६: भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)

१९२३: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २०११)

१९७८: अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.