२१ मे रोजी झालेले मृत्यू.

१४७१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १४२१)

१६८६: वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १६०२)

१९७९: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८९३)

१९९१: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या. (जन्म: २० ऑगस्ट १९४४)

१९९८: इंटकचे सोलापुरातील नेते आबासाहेब बाबूराव किल्लेदार यांचे निधन.

२०००: हर्बालाइफ कंपनी चे स्थापक मार्क आर. ह्यूजेस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९५६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.