२२ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१६९८: नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष शिवदिननाथ यांचा जन्म.

१७२४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४)

१८१२: भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)

१८७०: रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९२४)

१९०४: अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म.  (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)

१९१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म.  (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८)

१९१६: अभिनेत्री आणि गायिका काननदेवी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)

१९१६: व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९९९)

१९२९: चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च २००० – नाशिक)

१९२९: पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्रा. अशोक केळकर यांचा जन्म. (निधन: २० सप्टेंबर २०१४)

१९३५: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म.

१९४५: भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.