२२ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.

१९४५: रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)

१९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. (जन्म: ९ जून १९१२)

१९८९: आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक सॅम्युअल बेकेट यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०६)

१९९६: संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे यांचे निधन.

२००२: प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुळकर्णी यांचे निधन.

२०११: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३७)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.