२२ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.

१८१५: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)

१८२७: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७४१)

१९२५: ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८३६ – ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)

१९४४: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८६९)

१९५८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

१९८२: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८९४)

२०००: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)

२०००: प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३)

२००९: लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९४३)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.