२२ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.

१२९७: योगी चांगदेव यांनी समाधी घेतली.

१६६६: ५ वे मुघल सम्राट शहाजहान यांचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन. (जन्म: ५ जानेवारी १५९२)

१६८२: समर्थ रामदास स्वामी यांचे निधन.

१७९९: ऑस्ट्रीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे यांचे निधन.

१९०१: ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचे निधन. (जन्म: २४ मे १८१९)

१९२२: शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बायर फिद्रिक यांचे निधन.

१९६७: क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)

१९७२: राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)

१९७३: अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)

१९७५: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)

१९७८: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)

१९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्याच्या दोन मुलांची ओदिशाच्या केओंझोर जिल्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.