२२ जून रोजी झालेले जन्म.

१८०५: इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १८७२)

१८८७:  ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

१८९६: नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्म.

१८९९: मास्किंग टेप चे शोधक रिचर्ड गिर्ली ड्र्यू यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९८०)

१९०८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९९८)

१९२७: भारतीय-इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक एन्थोनी लो यांचा जन्म.  (मृत्यू: १२ फेब्रुवारी २०१५)

१९३२: आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी २००५ – मुंबई, महाराष्ट्र)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.