२२ मार्च – जन्म

२२ मार्च रोजी झालेले जन्म.

१९४२: भारतीय न्यायशास्त्रज्ञ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदा आयोगाचे अध्यक्ष अरुणाचलम लक्ष्मणन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २०२०)

१७९७: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८८८)

१९२४: यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)

१९२४: नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)

१९३०: ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक पॅट रॉबर्टसन यांचा जन्म.

१९३३: इराण चे पहिले अध्यक्ष अबोलहसन बनीसद्र यांचा जन्म.