२२ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना.

१८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

१९४३: लेबनॉन फ्रान्सपासुन स्वतंत्र झाला.

१९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा.

१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.

१९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.

१९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.

१९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.

१९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू.

१९९७: नायजेरियात मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.

२००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.

२०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.