२२ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

१८०८: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८९२)

१८७७: एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०)

१८८०: धर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५६)

१८८५: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९५१)

१८९०: फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)

१९०९: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द. शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)

१९१३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)

१९१५: चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)

१९२२: साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.

१९२६: मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००७)

१९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म.

१९४३: अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म.

१९४८: हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर सरोज खान यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै २०२०)

१९६७: टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म.

१९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.

१९७०: श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार मार्वन अट्टापट्टू यांचा जन्म.

१९८०: नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.