२२ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यु.

१९०२: जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)

१९२०: कवी व संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन.

१९४४: खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.

१९५७: नाट्यकर्मी पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)

१९६३: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)

१९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. (जन्म: २९ मे १९१७)

१९८०: हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती मे वेस्ट यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)

२०००: अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२)

२००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.

२००८: गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)

२०१२: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

२०१६: भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९३०)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.