२२ ऑक्टोबर – मृत्यू

१९१७: इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक चार्ल्स पार्डे ल्यूकिस यांचे निधन.

१९३३: थोर देशभक्त बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)

१९७८: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)

१९९१: देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक ग. म. सोहोनी यांचे निधन.

१९९८: हिंदी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १९२२)

२०००: अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचे निधन.

२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन.