२३ एप्रिल रोजी झालेले जन्म.

१५६४: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म. (निधन: २३ एप्रिल  १६१६)

१७९१: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८६८)

१८५८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९४७)

१८५८: समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)

१८७३: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९४४)

१८९७: नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे १४ वे पंतप्रधान लेस्टर बी. पिअर्सन यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)

१९३८: शास्त्रीय गायिका एस. जानकी यांचा जन्म.

१९७७: भारतीय-अमेरिकन अभिनेते काल पेन यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.