२३ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.

१८३४: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १७६६)

१९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या. (जन्म: २ फेब्रुवारी १८५६)

१९६५: नट व गायक, गंधर्व नाटक मंडळी चे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचे निधन. (जन्म: २ जुलै १८८०)

१९७९: हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार दत्ता कोरगावकर यांचे निधन.

१९९८: स्वातंत्र्यसैनिक रत्‍नाप्पा कुंभार यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ – निमशिरगाव, शिरोळ, कोल्हापूर)

२०००: मलिका-ए-तरन्नुम म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ – कसुर, पंजाब, भारत)

२००४: भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री नरसिंह राव यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२१)

२००८: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी १९३१)

२०१०: केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री, युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट चे संस्थापक के. करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९१६)

२०१०: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२८)

२०१३: एके ४७ रायफलचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९१९)

२०१३: भारतीय कवी आणि शिक्षक जी. एस. शिवारुद्रप्पा यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १९२६)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.