२३ जुलै रोजी झालेल्या घटना.

१८४०: कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.

१९०३: फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.

१९४२: ज्यूंचेशिरकाण – त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.

१९२७: मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले.

१९२९: इटलीतील फासिस्ट सरकारची परकीय शब्दांच्या वापरावर बंदी.

१९८२: इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन ने व्हेल माशांच्या व्यापारी मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

१९८३: एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली.

१९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.

१९८६: हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात.

१९९९: केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.