२३ जुलै रोजी झालेले मृत्यू.

१८८५: अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस ग्रांट यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८२२)

१९९७: शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन.

१९९९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)

२००४: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेमूद यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)

२०१२: आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.