२३ मार्च रोजी झालेले जन्म.

१९२९: भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांचा जन्म. (निधन: ७ सप्टेंबर २०२०)

१६९९: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन बार्ट्राम यांचा जन्म.

१७४९: फ्रेंच गणितज्ञ पिएर सिमॉन दि लाप्लास यांचा जन्म.

१८८१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दु गार्ड यांचा जन्म.

१८८१: नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मान स्टॉडिंगर यांचा जन्म.

१८८३: कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९६३)

१८९३: भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९७४)

१८९८: आसामी कवयित्री आणि लेखिका नलिनीबाला देवी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७७)

१९१०: समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६७)

१९१२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते वर्नर फॉन ब्रॉन यांचा जन्म.

१९१६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

१९२३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९४३)

१९३१: रशियन बुद्धीबळपटू व्हिक्टर कॉर्चनॉय यांचा जन्म.

१९५३: भारतीय महिला उद्योजक किरण मुजुमदार-शॉ यांचा जन्म.

१९५४: अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल प्रॉडक्शन चे स्थापक केनेथ कोल यांचा जन्म.

१९६८: इंग्लिश क्रिकेटपटू माईक अ‍ॅथरटन यांचा जन्म.

१९७६: भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा जन्म.

१९८७: अभिनेत्री कंगना रणावत यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.