२३ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.

८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)

१७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)

१८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)

१८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)

१९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)

१९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)

१९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२)

१९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.

१९६२: भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते संजीव सॅम गंभीर यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २०२०)

१९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.

१९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.