२३ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१९१०: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १८५३)

१९१५: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८४८)

१९२१: चाकाच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक जॉन बॉईड डनलॉप यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

१९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९०५)

२०१२: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.