२४ ऑगस्ट रोजी झालेले जन्म.

१८३३: गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)

१८७२: केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७)

१८८०: निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)

१८८८: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९५७)

१८८८: मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२)

१९०८: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

१९१७: किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्म.

१९१८: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)

१९२७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांचा जन्म.

१९२७: भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी यांचा जन्म.

१९२९: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यासर अराफत यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)

१९३२: व्यासंगी साहित्यसमीक्षक रावसाहेब जाधव यांचा जन्म.

१९४४: ओडीसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचा जन्म. (मृत्यू: २४ जून १९९७)

१९४५: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE) चे सहसंस्थापक विन्स मॅकमेहन  यांचा जन्म.

१९४७: ब्राझीलियन लेखक पाउलो कोएलो यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.